पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांच्यातील चर्चेची अत्यंत दुर्मीळ दृक्श्राव्य व्हिडीओ फीत प्रसारित झाली आहे. पनामा पेपर्सबाबतची चौकशी तातडीने पूर्ण करण्यासाठी राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांच्यावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
त्याचप्रमाणे मंगळवारी झालेल्या
या चर्चेच्या फुटेजमध्ये नवाझ शरीफ आणि राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांनी अलीकडेच लंडनला वैद्यकीय तपासणीसाठी दिलेल्या भेटीबाबत चर्चा करीत असल्याचे दिसत आहे.
आपल्याला वैद्यकीय तपासणीसाठी तारीख देण्यात आली असल्याचे नवाझ शरीफ सांगताना दिसत आहेत. त्या वेळी पंतप्रधानांनी त्यापूर्वीच लंडनला पोहोचले पाहिजे, असे राहील शरीफ सांगताना दिसत आहेत. पनामा पेपर्सबाबतची चौकशी तातडीने पूर्ण केली पाहिजे असे राहील शरीफ हे नवाझ शरीफ यांना त्याच चर्चेच्या
वेळी सांगत असल्याचेही दिसून येत आहे.
दोघांमध्ये अशा प्रकारची चर्चा झाल्याच्या वृत्ताचे सरकारने जोरदार खंडन केले आहे. केवळ दोघांमध्येच झालेल्या चर्चेत नेमके काय बोलणे झाले हे जाणणे अशक्य आहे, असे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif panama papers
First published on: 13-05-2016 at 01:50 IST