‘ती’ पत्रके सापडल्यामुळे बालाघाटमध्ये ‘हाय अ‍ॅलर्ट’

स्थानिक जनतेने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

स्थानिक जनतेने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन करणारी नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
‘टाडा दलम’ या नावाने बंडखोरांनी वितरित केलेली ही पत्रके जिल्ह्य़ातील रूपझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवारबेली, सोनगुड्डा आणि मछ्छुर्डा या ग्रामीण भागात भिंतींवर चिकटवण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
आदिवासींचे शोषण करणाऱ्या, तसेच अवैध खाणकामाला व भांडवलशाहीला उत्तेजन देणाऱ्या सरकारचा निषेध करतानाच, लोकांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन या पत्रकांमध्ये करण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक गौरव तिवारी यांनी दिली. बुधवारी ही पत्रके हस्तगत करण्यात आल्यानंतर रात्रीच पोलिसांनी सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naxal pamphlets recovered high alert sounded balaghat district in mp

ताज्या बातम्या