Latest Marathi news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातल्या कार्यक्रमानंतर थेट दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही होते. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची ही माहिती आहे. मात्र या भेटीत राज्यातल्या परिस्थितीविषयी चर्चा झाल्याची शक्यताही आहे. या भेटीचा समोर आला आहे.

महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच १५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहेत. तसंच मनोज जरांगे पाटील हे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. या आजारपणामुळे १५ दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यानंतर आज अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने दिल्लीला रवाना झाले. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्यात राजकीय चर्चाही झाल्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमधल्या मंत्र्यांची वेगळी विधानं दिसून आली तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारी होते. अमित शाह आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र महाराष्ट्रातल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.