देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हटले जाणारे अमित शहा आज ५७ वर्षांचे झाले आहेत. गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाचे अनेक मोठे नेते अमित शहा यांचे अभिनंदन करत आहेत. अमित शाह यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे. त्याद्वारे त्यांनी अमित शाह यांना उपरोधिक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Patanjali
“जाहिरातींच्या आकाराएवढा माफीनामा छापला का?” रामदेव बाबांना SC ने फटकारले; न्यायमूर्ती म्हणाल्या “मायक्रोस्कोप घेऊन…”
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

“माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुम्ही तुमचे वयाचे शतक पूर्ण करा. ज्याप्रमाणे खाद्यतेलांच्या किमती सतत वाढत आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या कर्तव्याचा आलेखही वाढला पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

“ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरची किंमत दुप्पट झाली आहे, त्याचप्रमाणे तुमचे यशही दुप्पट झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या प्रभावापासून वाचवण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती मिळावी यासाठी मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

या ट्विटमध्ये शुभेच्छा देणाऱ्या व्हिडीओसह देशभरातील माधम्यांना टॅग केले आहे. खासदार अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. खासदार म्हणून निवडून गेल्यापासून संसदेत अमोल कोल्हे यांनी केलेली अनेक भाषणे केली आहेत.

दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा देशात इंधन तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज पुन्हा तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ३५-३५ पैशांनी वाढवले ​​आहेत. त्यानंतर अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा देशातील इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.