आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करत काँग्रेसची शाब्दिक धुलाई केली आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडीत नेहरु आणि इंदिरा गांधी हे देशातल्या लोकांना कमी लेखत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यासाठी त्यांनी या दोघांच्या भाषणांमधले उल्लेखही वाचून दाखवले. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अभिभाषण केलं. त्यानंतरच्या धन्यवाद प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधींना मोदी म्हणाले प्रॉडक्ट

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडला. मल्लिकार्जुन खरगे हे लोकसभेतून राज्यसभेत गेले. एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलुप लागायची वेळ आली आहे. दुकान आम्ही म्हणत नाही. काँग्रेसचे लोक स्वतःच म्हणत आहेत. आमचं दुकान आहे याचा उल्लेख यांचेच लोक करतात. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ शब्दावर टीका केली. आम्ही घराणेशाहीची चर्चा करतो कारण जो पक्ष कुटुंब चालवतं, कुटुंबातल्या लोकांनाच प्राधान्य देतं. कुटुंबच सगळे निर्णय घेतं त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. लोकशाहीत हे योग्य नाही. राजकारणात एका कुटुंबातले दहा लोक आले तरीही काहीच प्रश्न नाही. पण ते त्यांच्या प्रतिभेवर आणि लोकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले हवेत, लादलेले नकोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Amit Shah
अमित शाहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा…”
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Congress strongly criticized Prime Minister Narendra Modi for destroying the country reputation and democracy
मोदींकडून लोकशाहीच्या चिंध्या! काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Pm Narendra Modi On Congress Manifesto
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची…”

हे पण वाचा- “थँक्यू अधीर रंजनजी..” म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली घराणेशाहीची व्याख्या

भाजपाला ३७० जागा मिळतील, मोदींनी व्यक्त केला विश्वास

“देशातल्या कोट्यवधी जनतेने विकसित भारताची संकल्प यात्रा पाहिली आहे. भगवान राम हे फक्त आपल्या घरी परतले आहेतच. शिवाय अशा एका मंदिराची निर्मिती झाली आहे जे भारतीय संस्कृतीसाठी महत्त्वाचं आहे. आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळही दूर नाही. १०० ते १२५ दिवस बाकी आहे. अब की बार चारसो पार हे सगळं देश मानतो आहे. मी खरंतर मी इथल्या संख्येबाबत बोलत नाही. मात्र एनडीएला ४०० पार जागा मिळतीलच पण भाजपाला ३७० जागा या निवडणुकीत मिळतील.” असा विश्वास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

“आमचा तिसरा कार्यकाळ हा खूप मोठ्या निर्णयांचा असणार आहे. मी लाल किल्ल्यावरुन सांगितलं होतं आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळीही बोललो होतो. देशाला पुढच्या एक हजार वर्षांपर्यंत समृद्ध ठेवण्याची सुरुवात करणारा आमचा तिसरा कार्यकाळ असेल. एका समृद्ध देशाचा पाया रचणारा हा कार्यकाळ असणार आहे. माझा देशाच्या १४० कोटी भारतीयांवर खूप विश्वास आहे. मागच्या दहा वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. गरीबांना जर साधन मिळालं, स्वाभिमान मिळालं तर गरीबीचा पराभव गरीब माणूस करतो. आम्ही तो मार्ग निवडला.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.