गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती गुरुवारी आणखी बिघडली. गेल्या ४८ तासांमध्ये मंडेला यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी तेथील वृत्तवाहिनीला सांगितले.
मंडेला यांची प्रकृती खालावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी आपला मोझाम्बिकचा दौरा रद्द केलाय. मंडेला तीन आठवडय़ांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती ढासळली असून दिवसेंदिवस त्यात कोणतीच सुधारणा होत नसल्याची चिन्हे आहेत. फुफ्फुसातील जंतूसंसर्गामुळे मंडेला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
नेल्सन मंडेला यांची प्रकृती आणखी खालावली
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला यांची प्रकृती गुरुवारी आणखी बिघडली.

First published on: 27-06-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nelson mandelas condition worsens