रुग्णाने सेवन केलेल्या पेरूमुळे त्याला निपाह विषाणूची लागण झाली आहे का, याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केरळमध्ये पाठविलेले डॉक्टरांचे पथक तपास करीत आहे.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोन आठवडे अगोदर आपण पेरू खाल्ला होता, असे रुग्णाने आपल्याला सांगितले. फळांवरील वटवाघळे निपाह विषाणूचे कॅरिअर असतात आणि त्यांच्या लाळेतून बाधा होऊ शकते. या नव्या माहितीची आम्ही अधिकाऱ्यांना कल्पना दिली असून त्याबाबत पाहणी करण्यास सांगितले आहे, असे एम्सचे डॉ. आशुतोष विश्वास यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.