ऑनलाइन बँकिंग गैरव्यवहार रोखण्यास सॉफ्टवेअर

सध्या अनेक बँका ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगचे सल्ले देत असतात. त्यात काही सुविधा असल्या, तरी अनेकदा मोठे आर्थिक फटके बसू शकतात.

सध्या अनेक बँका ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगचे सल्ले देत असतात. त्यात काही सुविधा असल्या, तरी अनेकदा मोठे आर्थिक फटके बसू शकतात. स्पॅम मेल किंवा इन्स्टंट मेसेजेस पाठवून तुमच्या खात्यातील पैसे लंपास केले जाऊ शकतात परंतु आता हे गैरप्रकार रोखण्यासाठी एक सॉफ्टवेअर संगणक वैज्ञानिकांनी विकसित केले आहे.
 संशोधकांच्या मते जर समजा तुम्हाला पेपाल मार्फत तुमच्या मित्राला दोन डॉलर पाठवायचे असतील, तर तुमच्या लॅपटॉपमध्ये असलेले मालवेअर त्या २ अमेरिकी डॉलरचे रूपांतर २००० अमेरिकी डॉलरमध्ये करून ते मालवेअर तयार करणाऱ्याच्या खात्यात टाकते, यालाच आपण लाखाचे १२ हजार होणे असे म्हणतो. संगणकावरील ऑनलाइन बँकिंगमध्ये असे प्रकार अनेकदा होतात व ग्राहक हताश होऊन बसण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. ‘जॉर्जिया टेक’ या संस्थेच्या वैज्ञानिकांनी गायरस नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केले असून त्यात मालवेअरला स्पॅम इमेल्स व इन्स्टंट मेसेजेस पाठवता येत नाहीत व अनधिकृत पद्धतीने आलेले पैशांच्या हस्तांतराचे आदेशही रोखले जातात.
सध्याही अशा गैरव्यवहारांपासून संरक्षण देणारे सॉफ्टवेअर (आज्ञावली ) आहेत पण त्यात मूळ वापरकर्त्यांचा इमेल पाठवण्याचा हेतू कळतो त्याला पैसे हस्तांतर करायचे आहेत हे समजते पण  इमेलचा तपशील किंवा रक्कम समजत नाही. पूर्ण संदर्भाशिवाय यात वापरकर्त्यांचा हेतू ओळखणे अवघड असते, त्यामुळे ते आर्थिक हस्तांतर संरक्षण सॉफ्टवेअर आहे की वापरकर्त्यांचे उपयोजन आहे हे समजत नाही.
जॉर्जिया टेक इनफॉर्मेशन सिक्युरिटी सेंटरचे संचालक वेंकी ली यांनी सांगितले, की गायरस सॉफ्टवेअर हे संगणकाच्या पडद्यावरील कोपऱ्यात एक पारदर्शक थरासारखा भासतो. जेव्हा गायरस सॉफ्टवेअरला संशयास्पद माहिती दिसते, तेव्हा ती ताबडतोब थांबवून तो व्यवहार पुढे होऊ दिला जात नाही व वापरकर्त्यांला कळवले जाते. टेक्स्टवर आधारित उपयोजनात वापरकर्त्यांचा उद्देश थेट पडद्यावर दिसतो व त्यात त्या व्यक्तीला पडद्यावर काय असावे व काय नसावे यात बदल करता येतो. गायरस सॉफ्टवेअर हे पूर्वनियोजित नियमानुसार चालते व त्यानुसार आदेश घेत असते. या सॉफ्टवेअरमध्ये दोन महत्त्वाचे भाग असतात एक म्हणजे वापरकर्त्यांचा हेतू ओळखणे व उपयोजनातील आंतरक्रिया ओळखणे. त्यामुळे मालवेअर असले तरी अतिशय अचूक पद्धतीने ऑनलाइन व्यवहार करता येतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New software developed that helps prevent online banking fraud

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या