Indian Students On New US Visa Rules: डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये त्यांचा एक निर्णय असाही आहे, ज्यामुळे अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ इच्छिणारे आणि अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अमेरिकेच्या विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनाने त्यांचे सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग्ज पब्लिक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, याबाबत द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अनेक विद्यार्थी व्हिसा अर्जदारांनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणी बोलताना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात नुकताच प्रवेश मिळवलेल्या दिल्लीच्या २४ वर्षीय तरुणाने म्हटले की, “माझा दिवस इंस्टाग्राम अकाउंटवरील जुन्या पोस्ट्सच्या शोधाने सुरू होतो. मी दर काही तासांनी विचार करतो की, एखाद्या जुन्या पोस्टमुळे मी कसा अडचणीत येऊ शकतो आणि ती डिलीट करतो.”

“राष्ट्रीय आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा” हवाला देत ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या निर्देशांमध्ये, व्हिसा अर्जदारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची प्रायव्हसी सेटिंग्ज पब्लिक करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कॉन्सुलर अधिकाऱ्यांकडून अर्जदाराचे सोशल मीडियावरील वर्तन तपासता येईल.

याचबरोबर, ट्रम्प प्रशासनाने अर्जदारांना गेल्या पाच वर्षांत त्यांनी वापरलेल्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजरनेमची माहिती देणे अनिवार्य केले आहे. गुरुवारी, भारतातील अमेरिकन दूतावासाने एक निवेदन जाहीर करून इशारा दिला की, सोशल मीडियाची माहिती उघड न करणाऱ्या अर्जदारांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. याचबरोबर त्यांना भविष्यातील व्हिसासाठीही अपात्र घोषित केले जाऊ शकते.”

या प्रकरणी बोलताना दिल्लीतील आणखी एक विद्यार्थी म्हणाला की, “मी जूनच्या सुरुवातीला अमेरिकेच्या व्हिसासाठी मुलाखत दिली होती. पण मी अजूनही व्हिसाची वाट पाहत आहे. व्हिसाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे खूपच अस्पष्ट आहेत. त्यात ‘अमेरिकन मूल्यांचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट’ असे म्हटले आहे. आम्हाला त्याचा अर्थ काय आहे हे देखील माहीत नाही.”

अनेक विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट्स इमिग्रेशन अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया खूप तणावपूर्ण वाटत आहे. कारण कोणती पोस्ट चिंताजनक ठरू शकते याबद्दल फारशी स्पष्टता नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्वर्डमध्ये प्रवेश घेतलेल्या मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणाने म्हटले की, “मी २२ मे रोजी त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स पब्लिक केले आहेत. तेव्हापासून, मी सर्व पोस्ट आर्काईव्ह केल्या आहेत, अगदी राजकीय देखील. मी आता एखादी पोस्ट देखील लाईक करणे थांबवले आहे.”