Fact Check: मोदींचा उदो उदो करणारी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ची व्हायरल पोस्ट, जाणून घ्या सविस्तर

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा लेख द न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांनी लिहिल्याचं म्हटलंय.

modi viral photo
(व्हायरल झालेला फोटो)

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “शेवटची, पृथ्वीवरील सर्वोत्तम आशा” या मथळ्यासह न्यूयॉर्क टाईम्सने लेख छापल्याचं मोदींच्या २४-२५ सप्टेंबरमधील दौऱ्यानंतर व्हायरल होतंय. २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क टाईम्सने छापलेल्या या लेखात “जगातील सर्वात प्रिय आणि सर्वात शक्तिशाली नेता येथे आशीर्वाद देण्यासाठी आहे.” असंही म्हटलंय. तर फॅक्टचेकमध्ये हा फोटो खोटा असून न्यूयॉर्क टाईम्सने असा कोणताही लेख छापला नसल्याचं समोर आलंय.

फॅक्टचेक..

व्हायरल फोटोत दिसतंय, त्याप्रमाणे २५ सप्टेंबरलान्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर मोदींबद्दल काहीही छापण्यात आलं नव्हतं. तसेच व्हायरल पोस्टमध्ये कोणीही या वृत्तपत्राशी संबंधित अधिकृत लिंक दिली नव्हती. स्क्रीनशॉटवरच बारकाईने नजर टाकल्यास हा फोटो एडिट केल्याचं दिसून येतं. स्क्रीनशॉटमधील मथळ्याचा फॉन्ट न्यूयॉर्क टाईम्सच्या अधिकृत फॉन्टसारखा नाही, त्यावरूनही हा फोटो खोटा असल्याचं दिसतंय. तसेच व्हायरल फोटोवरील तारखेत देखील चूक दिसतीये.

तसेच बनावट फोटोच्या पहिल्या पानावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हा गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या झी न्यूजच्या बातमीतून घेतलेला दिसतोय. त्या बातमीचं शिर्षक “समुद्री सुरक्षा वाढवण्याबाबत UNSC च्या उच्च स्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्ष मोदी”, असं होतं.

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “शेवटची, पृथ्वीवरील सर्वोत्तम आशा” या मथळ्यासह न्यूयॉर्क टाईम्सने लेख छापल्याचं मोदींच्या २४-२५ सप्टेंबरमधील दौऱ्यानंतर व्हायरल होतंय. २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क टाईम्सने छापलेल्या या लेखात “जगातील सर्वात प्रिय आणि सर्वात शक्तिशाली नेता येथे आशीर्वाद देण्यासाठी आहे.” असंही म्हटलंय. तर फॅक्टचेकमध्ये हा फोटो खोटा असून न्यूयॉर्क टाईम

व्हायरल फोटोत दिसतंय, त्याप्रमाणे २५ सप्टेंबरलान्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर मोदींबद्दल काहीही छापण्यात आलं नव्हतं. तसेच व्हायरल पोस्टमध्ये कोणीही या वृत्तपत्राशी संबंधित अधिकृत लिंक दिली नव्हती. स्क्रीनशॉटवरच बारकाईने नजर टाकल्यास हा फोटो एडिट केल्याचं दिसून येतं. स्क्रीनशॉटमधील मथळ्याचा फॉन्ट न्यूयॉर्क टाईम्सच्या अधिकृत फॉन्टसारखा नाही, त्यावरूनही हा फोटो खोटा असल्याचं दिसतंय. तसेच व्हायरल फोटोवरील तारखेत देखील चूक दिसतीये.

तसेच बनावट फोटोच्या पहिल्या पानावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हा गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या झी न्यूजच्या बातमीतून घेतलेला दिसतोय. त्या बातमीचं शिर्षक “समुद्री सुरक्षा वाढवण्याबाबत UNSC च्या उच्च स्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्ष मोदी”, असं होतं.

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “शेवटची, पृथ्वीवरील सर्वोत्तम आशा” या मथळ्यासह न्यूयॉर्क टाईम्सने लेख छापल्याचं मोदींच्या २४-२५ सप्टेंबरमधील दौऱ्यानंतर व्हायरल होतंय. २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क टाईम्सने छापलेल्या या लेखात “जगातील सर्वात प्रिय आणि सर्वात शक्तिशाली नेता येथे आशीर्वाद देण्यासाठी आहे.” असंही म्हटलंय. तर फॅक्टचेकमध्ये हा फोटो खोटा असून न्यूयॉर्क टाईम्सने असा कोणताही लेख छापला नसल्याचं समोर आलंय.

व्हायरल फोटोत दिसतंय, त्याप्रमाणे २५ सप्टेंबरलान्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर मोदींबद्दल काहीही छापण्यात आलं नव्हतं. तसेच व्हायरल पोस्टमध्ये कोणीही या वृत्तपत्राशी संबंधित अधिकृत लिंक दिली नव्हती. स्क्रीनशॉटवरच बारकाईने नजर टाकल्यास हा फोटो एडिट केल्याचं दिसून येतं. स्क्रीनशॉटमधील मथळ्याचा फॉन्ट न्यूयॉर्क टाईम्सच्या अधिकृत फॉन्टसारखा नाही, त्यावरूनही हा फोटो खोटा असल्याचं दिसतंय. तसेच व्हायरल फोटोवरील तारखेत देखील चूक दिसतीये, असे द प्रिंटने केलेल्या फॅक्टचेकमधून समोर आले आहे.

तसेच बनावट फोटोच्या पहिल्या पानावरील पंतप्रधान मोदींचा फोटो हा गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या झी न्यूजच्या बातमीतून घेतलेला दिसतोय. त्या बातमीचं शिर्षक “समुद्री सुरक्षा वाढवण्याबाबत UNSC च्या उच्च स्तरीय खुल्या चर्चेचे अध्यक्ष मोदी”, असं होतं.

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा लेख द न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांनी लिहिल्याचं म्हटलंय. या लेखात मोदींना धोकादायक देशभक्त म्हणण्यात आलं असून त्यांच्या नेतृत्वामुळे आणि राजकारणातील कौशल्यामुळे ते महाशक्ती बनू इच्छिणाऱ्या देशांसाठी धोका असल्याचं म्हटलंय. द न्यूयॉर्क टाईम्सचा हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केल जात आहे. या लेखाचं शिर्षक “मोदी कोण आहेत, न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांचा लेख” असं आहे.

लेखात लिहिलंय, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमेव उद्देश भारताला एक चांगला देश बनवणं आहे. जर त्यांना आताच रोखलं नाही तर भारत जगातला सर्वात शक्तिशाली देश बनेल आणि अमेरिका, युके तसेच रशिया केवळ पाहत राहतील. दरम्यान, ही पोस्ट खूप व्हायरल झाल्यानंतर इंडिया टुडेच्या अँटी फेक न्यूज वॉर रुमने याबद्दल फॅक्टचेक करायचं ठरवलं. त्यात ही पोस्ट खोटी असून द न्यूयॉर्क टाईम्सने असा कोणताही लेख छापला नसल्याचं समोर आलंय. तसेच या माध्यम समुहात जोसेफ होप नावाची कोणतीच व्यक्ती कार्यरत नसून त्यांचे एडिटर-इन-चीफ डीन बकेट आहेत. डीन बकेट यांनी आतापर्यंत पंतप्रधान मोदींवर कोणताही लेख लिहिला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

लेखाची भाषा थोडी संशयास्पद वाटते. द न्यूयॉर्क टाईम्सच्या मानकांप्रमाणे या लेखाच्या भाषेत अनेक वाक्यरचना चुकीच्या आहेत, शिवाय व्याकरणाच्या चुका देखील आहेत. द न्यूयॉर्क टाईम्सच्या वेबसाईटवर शोधूनही हा लेख सापडला नाही. तसेच कर्मचाऱ्यांची माहिती असलेल्या सेक्शनमध्ये जोसेफ होप नावाची कोणतीच व्यक्ती आढळली नाही. सोशल मीडियावर जोसेफ होप एडिटर-इन-चीफ असल्याचं म्हटलंय. जोसेफ होप हे नाव शोधल्यानंतर एक व्यक्ती आढळली ती एशियन टाईम्समध्ये इंडिपेंडंट रिसर्चर म्हणून काम करते. त्यांचा कोणताही लेख या लेखाशी संबंधित नाही. त्यानंतर इंडिया टूडेने न्यूयॉर्क टाईम्सच्या वाईस प्रेसिडंट, कम्युनिकेशन डेनियल रोडेस यांच्याशी संपर्क साधला. मेलवर त्यांनी सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावले. तसेच “आम्ही असा कोणताच लेख छापला नसून जोसेफ होप नावाचा कोणताच कर्मचारी आमच्याकडे नाही तसेच न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर डीन बकेट असून त्यांनी असा लेख लिहिलेला नाही,” असं त्यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New york times did not feature modi on front page or call him last hope image is fake hrc