पंजाब : नवज्योतसिंग सिद्धू यांचं शक्ती प्रदर्शन! आमदारांसह सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची माफी मागण्यास सिद्धू तयार नसल्याची देखील माहिती समोर

Navjot Singh Sidhu visits Golden Temple
पंजाब काँग्रेसचे ६० पेक्षा जास्त आमदार आपल्या सोबत आहे, असा दावा सिद्धू यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी अगोदर काँग्रेसमध्ये सुरू असेलला अंतर्गत कलह अद्याप संपलेला दिसत नाही. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर काँग्रेस हायकमांड यांच्या आदेशाने नवज्योतसिंग सिद्धू यांनी वर्णी लागल्यानंतर, आता मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे काहीसे दुखावल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनी शक्ती प्रदर्शनास सुरूवात केल्याचेही दिसून येत आहे.

आज काँग्रेस प्रदेशाध्य नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी काँग्रेसचे ६० आमदार जमले होते, शिवाय सिद्धू यांनी सर्व समर्थक व आमदारांसह अमृतसर येथील सुवर्णमंदिरात जाऊन दर्शन देखील घेतले.

तर, दुसरीकडे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडून हे स्पष्ट झाले आहे की सिद्धू यांनी माफी मागितल्याशिवाय ते कोणतीही बैठक घेणार नाहीत. त्यावर आता, सिद्धू देखील कोणत्याही परिस्थितीत माफी मागण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. आज तक ने हे वृत्त दिले आहे.

सध्या सिद्धू आपल्या सर्व समर्थकांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यांचा दावा आहे की त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसच्या ८० आमदारांपैकी ६२ आमदार आहेत. विशेष म्हणजे सिद्धू यांची प्रदेशाध्यक्ष निवड झाल्यापासून आतापर्यंत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचे अभिनंदन देखील केलेले नाही.

“माफी मागितल्याशिवाय मी नवज्योत सिंग सिद्धूंची भेट घेणार नाही,” अमरिंदर सिंग अद्यापही नाराजच

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रवीण ठुकराल यांनी पंजाबमधील सध्या सुरू असलेल्या वादाबाबत सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात झालेल्या बैठकीच्या चर्चांना फेटाळून लावले. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही वेळ मागितलेली नाही. सिद्धू यांच्या वृत्तीत कोणताही बदल नाही. सिद्धू हे सोशल मीडियावर केलेल्या अपमानजनक वक्तव्यांबद्दल जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे माफी मागत नाहीत तो पर्यंत कोणतीही भेट होणार नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Newly appointed punjab congress chief navjot singh sidhu visits golden temple in amritsar msr

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या