जवळपास १४ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर येथील न्यायालयाने शनिवारी नव्याने आरोप दाखल केले.
मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रकला जैन यांनी नव्याने दाखल करण्यात आलेल्या आरोपांचे वाचन केले. वन्यजीवसंरक्षण कायदा आणि भादंविमधील संबंधित कलमान्वये आरोप दाखल करण्यात आले असून या खटल्याची सुनावणी २७ एप्रिल रोजी मुक्रर करण्यात आली आहे.
न्यायमूर्तीनी वाचून दाखविलेल्या आरोपांचा या अभिनेत्यांनी स्पष्ट इन्कार केला आहे. सलमान खान यानेही शनिवारी न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र तो गैरहजर होता. उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१२ मध्ये या अभिनेत्यांवरील आरोप फेरनिश्चित केले.
जोधपूरमधील कंकणी गावात ऑक्टोबर १९९८ मध्ये या अभिनेत्यांनी दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण त्यावेळी सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly charges on saif sonali tabbu nilam on antelope hunting matter
First published on: 24-03-2013 at 02:43 IST