राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने मंगळवारी २०१३ सालच्या हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणात यासिन भटकळसह इंडियन मुजाहिदीनचे पाच दहशतवादी दोषी असल्याचा निकाल दिला. येत्या १९ डिसेंबरला न्यायालयाकडून शिक्षेची सुनावणी केली जाईल. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना दोषी ठरविण्यात आल्याचा हा पहिलाच न्यायालयीन निकाल आहे. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हैदराबादच्या दिलखुशनगर येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण जखमी झाले होते. या कटाचा मुख्य सूत्रधार रियाझ भटकळ अद्यापही फरार आहे.