हैदराबाद : विजेवरील वाहनांच्या दुर्घटनांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आह़े  सदोष दुचाकी वाहने परत मागविण्याची सूचना गडकरी यांनी विजेवरील वाहन निर्मिती कंपन्यांना गुरुवारी केली़ 

पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने अवलंबले असले तरी विजेवरील वाहनांसंबंधीच्या दुर्घटना समोर आल्या आहेत़  ‘प्युअर ईव्ही’च्या दुचाकींसंबंधीच्या दुर्घटना तेलंगणमधील निझामाबाद आणि चेन्नईमध्ये घडल्या़  तेलंगणमधील दुर्घटनेत बॅटरीचा स्फोट होऊन एका ८० वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाल़े  त्याआधी पुण्यामध्येही अशीच एक दुर्घटना घडली होती़

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ट्विटद्वारे या दुर्घटनांबाबत चिंता व्यक्त केली़  ‘‘गेल्या दोन महिन्यांत अशा अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत़  त्यात काहींना प्राण गमवावा लागला, हे दुदैवी आह़े  त्यामुळे विजेवरील दुचाकी निर्मात्या कंपन्यांनी तातडीने पावले उचलून सदोष वाहने परत मागवावीत’’, असे गडकरी यांनी स्पष्ट केल़े  या दुर्घटनांबाबत चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली असून, वाहनांच्या दर्जाबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितल़े

प्युअर ईव्हीकडून दोन हजार वाहने माघारी

‘प्युअर ईव्ही’च्या दुचाकी वाहनांसंबंधीच्या दुर्घटना तेलंगण आणि चेन्नईमध्ये घडल्या़  त्यामुळे ‘प्युअर ईव्ही’ने ‘ईट्रान्स प्लस’,  ‘ईप्लुटो ७जी’ मॉडेलची दोन हजार वाहने परत मागवत असल्याचे निवेदनाद्वारे जाहीर केल़े