दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या कामा दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्वाधिक प्रमाणात काँक्रिटचा वापर करून द्रुतगती महामार्गाचे काम करण्याचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. अशी माहिती निती गडकरी यांनी दिली आहे. त्यामुळे एकप्रकारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातून विश्वविक्रमाचीच नोंद केली आहे. तर, याबदद्ल राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शब्दांमध्ये त्यांचे अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विक्रमाबद्दल माहिती देताना नितीन गडकरींनी सांगितलं आहे की, “दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करतांना २४ तासांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत.  तसेच,  देशासाठी पायाभूत सुविधा पूर्वी पेक्षा अधिक वेगाने तयार करण्यात येत आहेत. आम्ही केवळ नवीन मापदंड घालून दिले नाही तर जागतिक विक्रमही केला आहे.”

ही माहिती देताना गडकरींनी,  रस्ता निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये PQCचा सर्वाधिक वापर केला गेला.  २४ तासांत PQCचे सर्वाधिक उत्पादन केले गेले, PQC ने २४ तासांपर्यंत सलग १८.७५ मीटर रुंद रस्त्याची निर्मिती केली गेली व  २४ तासांमध्ये एक्स्प्रेस वे वर PQC च्या वापराने जेवढा रस्ता तयार केला गेला, तो देखील एक विश्वविक्रम आहे.  हे चार मुद्दे देखील निदर्शनास आणून दिले आहेत.

तर,  “आपला देश व मुंबईसाठी ही मोठी कामगिरी आहे. रस्ते विकास प्रकल्पांच्या या आश्चर्यकारक गतीबद्दल नितीन गडकरीजी तुमचे खूप अभिनिंदन.” अशा शब्दांमध्ये नितीन गडकरी यांनी केलेल्या या विश्वविक्रमाबद्दल त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari set a world record congratulations by fadnavis msr
First published on: 03-02-2021 at 18:59 IST