देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीत आपले नाव समाविष्ट केल्याबद्दल भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी देशातील ८ ते १० सर्वाधिक भ्रष्ट राजकीय नेत्यांची यादी शुक्रवारी पत्रकारांसमोर जाहीर केली. यात इतर नेत्यांसोबत नितीन गडकरींचेही नाव आहे. गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिमा डागाळली असल्याचा ठपका ठेवून गडकरी यांनी आपले वकील पिंकी आनंद यांच्यामार्फत केजरीवालांना कायदेशीर नोटीस पाठवली.
“भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत आरोप सिद्ध करावेत अन्यथा राजीनामा द्यावा. केजरीवाल यांनी माझ्याविरोधातील आरोप सिद्ध केले तर राजकारणातून निवृत्त होईन. माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीने असे आरोप करावेत हे आश्चर्यजनक आहे.”
कपिल सिब्बल, केंद्रीय मंत्री
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
गडकरींची केजरीवाल यांना नोटीस
देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीत आपले नाव समाविष्ट केल्याबद्दल भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल
First published on: 02-02-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari slaps defamation notice on arvind kejriwal