पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार दोन वर्षे पूर्ण करत असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरकारच्या कामावर टीका केली. सत्तेवर आल्यापासून दोन वर्षांत तर काहीच केले नाही. आता उरलेल्या तीन वर्षांत काही करण्याचा प्रयत्न करा, असा टोला नितीशकुमार यांनी लगावला आहे. पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारवर टीका केली.
मे २०१६ मध्ये केंद्रात सत्ताबदल होऊन भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या विभागाच्या मंत्र्यांच्या मुलाखती घेण्यात आला. सरकारने गेल्या दोन वर्षात केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश भाजपशासित राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल आघाडीकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भाजपला नितीशकुमार यांनी टोला लगावला.