विरोधी पक्षाच्या मान्यतेबाबत बिहारमध्ये आता वाद

बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी जनता दल(यू)ला विरोधी पक्षाचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय दिल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे भाजपने स्पष्ट केले.

बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी जनता दल(यू)ला विरोधी पक्षाचा दर्जा देण्याच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय दिल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे भाजपने स्पष्ट केले. जनता दलाने मुख्यमंत्री जितनकुमार मांझी यांना असंलग्न सदस्य घोषित केलेले असले, तरी ते अद्याप जनता दल(यू) सोबतच असल्यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाने आपल्याला विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्याची केलेली विनंती कायदेशीररीत्या सयुक्तिक नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nitish kumar targets pm modi over escalating