scorecardresearch

Bihar Cabinet Expansion : बिहार राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार, नितीशकुमार यांच्याकडे गृह तर ‘राजद’कडे अर्थमंत्रीपद?

बिहारमधील राजभवनात सकाळी ११.३० वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Bihar Cabinet Expansion : बिहार राज्य मंत्रीमंडळाचा आज विस्तार, नितीशकुमार यांच्याकडे गृह तर ‘राजद’कडे अर्थमंत्रीपद?
नितीशकुमार आणि तेजस्वी यादव (फोटो-PTI)

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस तसेच इतर पक्षांना सोबत घेत बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकारची स्थापनी केली. दरम्यान १० ऑगस्ट रोजी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज (१६ऑगस्ट) बिहार राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. बिहारमधील राजभवनात सकाळी ११.३० वाजता मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा >>> बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात महागठबंधनमधील विविध पक्षांचे नेते आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रीमंडळ विस्तारात एक-दोन वगळता यापूर्वी असलेली सर्व खाती नितीश कुमार यांच्या पक्षाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राजद पक्षाला एकूण १५ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला २ तर जदयू पक्षाला १२ मंत्रीपदे दिली जातील, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार! नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

दरम्यान, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांचा राजद तसेच काँग्रेस आणि तर पक्षांना सोबत घेत महागठबंधन करून बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या सर्व आमदारांचा नितीशकुमार यांनी पाठिंबा दिलेला आहे.

बिहारमध्ये पक्षीय बलाबल किती ?

बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २४२ आहे. यातील भाजपाचे एकूण ७७ तर जदयुचे ४५ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्यूलर) ४, राजद ७९ काँग्रेस १९ सीपीआय (एमएल) १२, सीपीआय १४, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. महागठबंधनमध्ये एकूण राजद, जदयू, काँग्रसे हिंदुस्तानी आवाम मोर्चा, सीपीआय (एमएल), सीपीआय पक्ष असून त्यांचे पक्षीय बलाबल १६३ असे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.