“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, पण…”, AIMPLB ची सर्वोच्च न्यायालयात माहिती | Loksatta

“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, पण…”, AIMPLB ची सर्वोच्च न्यायालयात माहिती

वकील फरहा अन्वर हुसैन शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Supreme court
"मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, पण…", AIMPLB ची सर्वोच्च न्यायालयात माहिती

मुस्लीम महिलांनी मशिदीत नमाज पठण करण्यासंबंधी एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी ( ८ फेब्रुवारी ) सुनावणी पार पडली. तेव्हा ‘ऑल इंडिया मुस्लिस पर्सनल लॉ बोर्ड’च्या ( एआयएमपीएलबी ) वतीने महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास परवानगी आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली.

पुण्यातील वकील फरहा अन्वर हुसैन शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात भारतातील मशिदींमध्ये मुस्लीम महिलांना प्रवेश नमाज पठण करण्यास मनाई करण्यात येत असून, ते बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचा दावा केला होता. त्यावर ‘एआयएमपीएलबी’ने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं.

हेही वाचा : हिंडेनबर्गनंतर ‘अदाणी’ला आणखी एक मोठा झटका; फ्रान्ससोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित!

‘एआयएमपीएलबी’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं की, “मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास अथवा नमाज पठण करण्यास मनाई नाही. तसेच, महिलांनी दिवसातून पाचवेळा नमाज सामूहिक रित्या पठण करण्याची गरज नाही. पण, महिलांनी घरी किंवा मशिदीत नमाज पठण केलं तरी, इस्लामनुसार त्यांना पुण्य मिळणार आहे,” अशी माहिती मुस्लीम लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:26 IST
Next Story
हिंडेनबर्गनंतर ‘अदाणी’ला आणखी एक मोठा झटका; फ्रान्ससोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित!