इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) चे संस्थापक एलॉन मस्क यांनी हमास शी संबंधित शेकडो खाती हटवली आहेत. दहशतवादी संघटनांसाठी X वर काहीही स्थान नाही असं म्हणत ही अकाऊंट हटवण्यात आली आहेत.

X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी म्हटलं आहे की, “X लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, सध्याचा काळ महत्वाचा आहे. आमच्या माध्यमावर पोस्ट केल्या जाणाऱ्या बेकायदा आणि चुकीच्या पोस्टने काय होऊ शकतं हे आम्हाला माहित आहे. दहशतवादी संघटना, फुटिरतावादी यांना X वर काहीही स्थान नाही. आत्तापर्यंत अशी शेकडो खाती हटवण्यात आली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही सुरु राहणार आहे.”

सोशल मीडियावर जो मजकूर पोस्ट करण्यात येतो त्याबाबत युरोपियन संघाने चिंता व्यक्त केली होती. एक्स आणि फेसबुक अशा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह किंवा भावना भडकवणारा, चिथावणी देणारा मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेत हमास या दहशतवादी संघटनेला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना X वर स्थान नाही म्हणत शेकडो अकाऊंट्स हटवली आहेत आणि ही प्रक्रिया यापुढेही चालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.