देशातील दहशतवादी संघटनांच्या यादीत एकही हिंदू संघटना नसल्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गृहमंत्रालयाने ही माहिती दिली.
शिंदे यांनी भगव्या दहशतवादी संघटनांच्या बाबतीत नुकतेच भाष्य केले आणि त्यानंतर त्याविषयी खेद व्यक्त केला होता. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी त्यांचे उत्तर महत्त्वपूर्ण ठरले आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायद्यानुसार देशातील कोणत्याही हिंदूू संघटनेवर बंदी घालण्यात आलेली नाही, असे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
सिमी, लिट्टे आणि पीपल्स लिबरेशन आर्मीसह केंद्राने ३६ दहशतवादी आणि ९ बेकायदेशीर संघटनांवर बंदी घातली असल्याची माहिती या उत्तरात देण्यात आली आहे.