इस्लामिक स्टेटकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना घाबरून फ्रान्स कधीच आपला दहशतवादविरोधी लढा थांबू देणार नाही, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये स्पष्ट केले.
इस्लामिक स्टेटमधील दहशतवाद्यांनी एक नवा व्हिडिओ प्रसारित केला असून, त्यात थेट ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि तेथील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभापती जॉन बर्को यांनाच धमकावण्यात आले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यामध्ये ज्या दहशतवाद्यांनी सहभाग घेतला. त्या सर्वांची छायाचित्रे या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक दाखविण्यात आली आहेत. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार अब्देलहमीद अबौद याला पॅरिस पोलिसांनी कंठस्नान घातले असले, तरी त्यालाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ १७ मिनिटांचा असून, त्यामध्ये आयसिसकडून नागरिकांची कशी क्रूरपणे हत्या केली जाते, त्याचेही चित्रीकरण त्यामध्ये दाखविण्यात आले आहे.
या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ओलांद म्हणाले, दहशतवादाचा बिमोड करण्यास फ्रान्स कटिबद्ध आहे. त्यामुळे अशा व्हिडिओंमुळे आम्ही आमची कारवाई कधीच थांबवणार नाही. पुढील काळातही दहशतवादाविरोधातील कारवाई सुरूच राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआयसिसISIS
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No threat will make france waver in the fight against terrorism francois hollande
First published on: 25-01-2016 at 15:02 IST