केंद्र सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा देत विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर ४३.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या दरात सतत घसरण सुरू असल्याने सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तसेच जेट विमानाच्या इंधनात देखील १२.५ टक्क्यांची दरकपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, नव्या दरानुसार १४.२ किलोगॅमचा सिलिंडर दिल्लीमध्ये ७०८ रुपयांना मिळणार आहे. तर, मुंबई आणि चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत अनुक्रमे ७२५ आणि ७०५ रु. असणार आहे.
याआधी १ डिसेंबर २०१४ रोजी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ११३ रुपयांची मोठी कपात झाली होती. त्यानंतर महिन्याभरातच पुन्हा एकदा सिलिंडरचे दर ४३.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मात्र, अनुदानित सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल होणार नाहीत.