उत्तर कोरियाने त्यांचे शेजारी देश चीन आणि रशियाबरोबरच्या सीमा सील केल्या आहेत. २०२०-२१ मध्ये जेव्हा कोरोनामुळे संपूर्ण जग एकप्रकारे बंद पडलं होतं. सगळीकडे लॉकडाऊन होता, लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. तेव्हा उत्तर कोरियात मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. या काळात उत्तर कोरियाने त्यांच्या चीन आणि रशियालगतच्या सीमेवर शेकडो किलोमीटरची नवीन भिंत बांधली आहे. ही संरक्षक भिंत बांधत असताना भिंतीलगत ठराविक अंतरावर चौक्याही बांधल्या आहेत. तसेच संरक्षण यंत्रणा बसवली आहे.

उत्तर कोरियाच्या सीमेवरील भिंत दर्शवणारे काही फोटो रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. या देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या नागरिकांचा रस्ता या भिंतींमुळे आता बंद झाला आहे. उत्तर कोरियातील लोकांना देशाच्या उत्तर सीमेवरून बाहेर पळून जाता येत होतं. तसेच तिथून माहिती मिळवणं, व्यापार करता येत होता. परंतु या भिंतीमुळे आता हे सगळं बंद होणार आहे.

कोरोना काळात जगभर लॉकडाऊन घोषित केलेला असताना उत्तर कोरियाने मात्र या काळात त्यांच्या सीमेवर शेकडो किलोमीटरपर्यंतची नवीन भिंत बांधली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने चीन आणि रशियाच्या सीमा सील केल्या आहेत. यामुळे तस्करीचे मार्ग बंद झाले आहेत. तसेच उत्तर कोरियातून पळून जाणाऱ्यांचे मार्ग बंद झाले आहेत.

हे ही वाचा >> अबू सालेमचा भाचा मुंबईत फूटपाथवर चहा पित होता, तेवढ्यात उत्तर प्रदेश पोलिसांचं पथक आलं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर कोरियाने केवळ साध्या विटा आणि सीमेंटची भिंत बांधलेली नाही. ही भिंत मजबूत तर आहेच. तसेच यावर कुंपण, गार्ड पोस्ट, चौक्या, कमर्शियल सॅटेलाईट इमेजरी शो तसेच इतर सुरक्षा प्रणाली उभारण्यात आली आहे. यामुळे किम जोंग उन आता देशातली माहिती नियंत्रित करू शकतात. कोणत्याही प्रकारची माहिती देशाबाहेर जाणार नाही. तसेच बाहेरची कोणतीही गोष्ट देशात प्रवेश करू शकणार नाही, याची काळजी किम जोंगने घेतली आहे. या भिंतीमुळे किम जोंग उन बाहेरच्या जगातील प्रत्येक गोष्टीपासून उत्तर कोरियावासियांना दूर ठेवू शकणार आहेत.