नासाच्या कॅसिनी अवकाशयानाने घेतलेल्या छायाचित्रानुसार शनिच्या उत्तर भागात मोठय़ा प्रमाणात सूर्यप्रकाश पडत असल्याचे दिसून आले आहे. कडी असलेल्या या ग्रहाचा उत्तर भाग सूर्यप्रकाशात न्हाऊन निघतो आहे. २०१६ मध्ये १२ लाख किलोमीटर अंतरावरून घेतलेल्या छायाचित्रात अष्टकोनाकार जेट प्रवाह दिसत असून. त्यामुळे शनिचा हा भाग प्रकाशित झालेला दिसतो. जिथे ढग खाली आलेले आहेत अशा ठिकाणी अंधार आहे. शनिवरील ऋतुमानाचा फायदा घेऊन कॅसिनी यानाने अनुकूल अवस्थेत छायाचित्रे टिपली आहेत. उत्तर अर्धगोलार्धात उन्हाळा असल्याने तेथे सूर्यप्रकाश जास्त दिसून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिच्या कडय़ांच्या प्रतलात ५१ अंशावर काही कडी सूर्यप्रकाशाच्या भागात दिसतात. कॅसिनी यानाने विस्तृत कोनाच्या कॅमेऱ्यातून ९ सप्टेंबर २०१६ रोजी छायाचित्र घेतले होते, त्यात स्पेक्ट्रल फिल्टरचा वापर करण्यात आला होता. या फिल्टरमुळे ७२८ नॅनोमीटर तरंगलांबीचे अवरक्त किरण कॅमेऱ्यात प्रवेश करू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northern hemisphere part of saturn in the sun
First published on: 03-01-2017 at 01:39 IST