भारतात गेल्या १५ वर्षांत ४१.५ कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २००५-०६ ते २०१९-२१ या वर्षांमध्ये देशातील गरिबीमध्ये मोठी घट झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या ‘मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक बदल असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. २०३० पर्यंत दारिद्रय रेषेखाली जगणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांचे प्रमाण निम्म्याहून अधिक कमी करण्याचे लक्ष्य शक्य असल्याचे संयुक्त राष्ट्राने या अहवालात म्हटले आहे.

Global Hunger Index: भारताची परिस्थिती पाकिस्तान व नेपाळपेक्षाही वाईट; जागतिक भूक निर्देशांकात घसरण!

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्रय आणि मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातील दारिद्रय निर्मुलनासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक करण्यात आले आहे. जागतिक भूक निर्देशांकात इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यातच देशातील गरिबीत घट होत असल्याचा अहवाल पुढे आल्यानंतर सरकारला दिलासा मिळाला आहे.

‘किंगफिशर, येस बँकसारख्या…’ सुब्रमण्यम स्वामींचा आरबीआयच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे.