अध्यक्ष बराक ओबामा हे ख्रिसमसच्या सुटीसाठी त्यांच्या हवाई या जन्मठिकाणी आले असून त्यांचे एअरफोर्स विमान तेथील पर्ल हार्बर हिकहॅम येथे हवाई तळावर दाखल झाले. मिशेल ओबामा व ओबामाकन्याही यावेळी त्यांच्या समवेत आहेत. ओबामा दोन दिवस ओआहू बेटावर राहणार असून नंतर जानेवारीत ते अमेरिकेला परतणार आहेत. साधारणपणे ओबामा हवाईला आल्यानंतर गोल्फ खेळतात, होनोलूलू येथे रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतात व आइस ट्रीटही देतात. पण यावेळी त्यांचे कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले नाहीत. व्हाईट हाऊसमधून निघण्यापूर्वी ओबामा यांनी सांगितले की, आपण ख्रिसमस कुटुंबीयांसमवेत शांततेत घालवणार आहोत. त्यांनी वार्ताहरांना मेली कालीकिमाका म्हणजे मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छा हवाईच्या भाषेत दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
नाताळच्या सुटीसाठी ओबामा हवाईत दाखल
अध्यक्ष बराक ओबामा हे ख्रिसमसच्या सुटीसाठी त्यांच्या हवाई या जन्मठिकाणी आले असून त्यांचे एअरफोर्स विमान तेथील पर्ल हार्बर हिकहॅम येथे हवाई तळावर दाखल झाले.

First published on: 22-12-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama starts his christmas vacation