Odisha forest official raid Rs 1.43 crore cash and Rs 1.5 kg gold other assets : ओडिशा दक्षता विभागाने एका कनिष्ठ श्रेणीच्या वन अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड सापडल्याची घटना समोर आली आहे. या अधिकाऱ्याकडे घराच एका गुप्त तिजोरीत लपवून ठेवलेली १.४३ कोटी रुपयांची रोकड, १.३२ कोटींचे बँक डिपॉझिटस १.५ किलो सोने आणि ४.६३७ किलो चांदी, इथकेच नाही तर अनेक ठिकाणी घरे आणि मौल्यवान जमिनी इतके घबाड सापडले आहे.

कोरापूत जिल्ह्यातील जयपुर (Jeypore) फॉरेस्ट रेंज येथील डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्याशी संबंधीत सहा मालमत्तांवर एकाच वेळी शुक्रवारी दक्षता विभागाने धाडी टाकल्या, अशी माहिती दक्षता विभागाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. जेयपोरे आणि भुवनेश्वर येथे पथकांनी धाडी टाकल्या. अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे पाच महिन्यानंतर हे अधिकारी सेवेतून निवृत्त होणार आहेत.

दक्षता अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना जयपोरे शहरातील त्याच्या एका फ्लॅटमधील गुप्त तिजोरीत लपवून ठेवलेले १.४ कोटी रुपये आढळून आले आहेत. इतकेच नाही तर अधिकाऱ्यांना छाप्यादरम्यान सोन्याची बिस्किटे आणि सोन्याचे नाणी देखील सापडली आहेत.

या अधिकाऱ्याकडे सापडलेल्या स्थावर मालमत्तेमध्ये अधिकाऱ्यांना जयपुर येथे अंदाजे ३,६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तीन मजली इमारत, भुवनेश्वरमध्ये १,८०० चौरस फूट क्षेत्रफळाचा ३ बीएचके फ्लॅट आणि जयपुर शहरात १,५०० चौरस फूटचे दोन फ्लॅट आणि दोन महागडे प्लॉट सापडले आहेत. व्हिजिलान्स टेक्निकल विंद ही सध्या या मालमत्तांची मोजणी आणि त्यांची किंमत ठरवण्याचे काम करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान या प्रकरणात छापे सुरूच असल्याने अधिकाऱ्यांना वन अधिकाऱ्याशी संबंधित आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे, असे दक्षता विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अॅक्ट अंतर्गत त्या अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोंदीनुसार नेपाक हा कोरापुट सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजनमध्ये व्हिलेज फॉरेस्ट वर्कर म्हणून १९८९ मध्ये सरकारी सेवेत रूजू झाला. सध्या तो जयपुर फॉरेस्टमध्ये इन-चार्ज रेंजर असून डेप्युटी रेंजर पदावर काम करत आहे. त्याला एकूण ७६,८८० रुपये दरमहा वेतन मिळते.