ओदिशातील अंगुलमधील तालचेर कोळसा क्षेत्रातील एका खाणीत स्फोट घडवून आणल्यानंतर कोळशाचा ढिगारा कोसळल्याने एका कामगाराचा त्याखील दबून मृत्यू झाला. तर अन्य काहीजण देखील खाणीत अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत ९ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना कोल इंडिय लिमिटेड माइनमध्ये मंगळवारी रात्री उशीरा घडली. या ठिकाणी अद्यापही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्थानिक लोकांनी सांगितले आहे की, खाणीत करण्यात आलेल्या एका स्फोटानंतर भूस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली.