छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात आज सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे.
विजापूर जिल्ह्यातील मुरदांडा गावाजवळ हा गोळीबार झाला. सीआरपीएफच्या १६८ बटालियनचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सीआरपीएफचा जिग्नेश पटेल हा जवान शहीद झाला. सीआरपीएफ जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crpf jawan dead in naxalist attack
First published on: 09-08-2014 at 06:00 IST