करोना महामारीमुळे गेले कित्येक महिने बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांवर आणि विशेषत: ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एका नवीन सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागांतील फक्त ८ टक्के विद्यार्थी हे नियमितपणे ऑनलाइन अभ्यास करतात आणि ३७ टक्के बिलकुलच अभ्यास करत नाहीत. एकूण १५ राज्यांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधून बाहेर पडावं लागलं आहे. गेल्या तब्बल १७ महिन्यांच्या या शालेय लॉकडाऊनदरम्यान खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्यांपैकी एक चतुर्थांशाहून अधिक विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळले आहेत. यासाठी प्रमुख दोन कारणं सांगितली जात आहेत. पहिलं म्हणजे कमी कौटुंबिक कमाई आणि दुसरं म्हणजे ऑनलाइन शिक्षण आपल्या मुलांसाठी योग्य ठरत नसल्याचं पालकांचं निरीक्षण.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online education how many students study online shocking statistics gst
First published on: 07-09-2021 at 11:17 IST