Online Fraud : प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या नावाने एका माजी लष्करी अधिकाऱ्याची ७२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत इलॉन मस्क यांच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली आहे.

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं की, जानेवारी २०२४ पासू मस्क एक्स ऑफिशियल आणि ॲना शर्मन अशा दोन सोशल मीडिया अकाउंट्सने माजी लष्करी अधिकाऱ्याला फॉलो करण्यास सुरुवात केली. यानंतर या माजी लष्करी अधिकाऱ्यामध्ये त्या दोन सोशल मीडिया अकाउंट्सवरून संवाद सुरु झाला. तेव्हा दावा केला की ते एलोन मस्कची आई (‘मेय मस्क) आणि मे मस्कचे व्यवस्थापक अण्णा शर्मन असल्याचं सांगण्यात आलं.

त्यानंतर शर्मनने त्यांना सांगितलं की जर तुम्ही SpaceX मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला इलॉन मस्क भेटण्याची आणि टेस्ला कंपनीबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्याची संधी मिळेल. त्याच्या संमतीनंतर त्याला एका अमेरिकन नंबरवर व्हॉट्सॲपवर ॲड करण्यात आलं आणि सांगितलं की इलॉन मस्कही तुमच्याशी इथे बोलतील. यानंतर त्यांना बनावट इलॉन मस्कबरोबर संभाषण करायला लावलं आणि स्पेसएक्स आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं असल्याचा दावा तक्रारीत केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने मनी कंट्रोल दिलं आहे.

दरम्यान, या निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर एका खाते क्रमांकावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे मागत राहिले. तसेच अण्णा शर्मन असल्याचा दावा करणाऱ्याने सांगितलं की, जर त्यांनी टेस्लामध्ये आणखी दोन शेअर्स खरेदी केले तर त्यांच्याकडे कार असेल. या आमिषाला बळी पडून या निवृत्त अधिकाऱ्याने शेअर्समध्ये गुंतवणूक केली.

दरम्यान, माजी लष्करी अधिकाऱ्याने तब्बल २२ वेळा रक्कम हस्तांतरित केली. तसेच संबंधित फसवणूक करणाऱ्याने या माजी लष्करी अधिकाऱ्याला त्यांची रक्कम मस्क यांच्या विविध कंपन्यांमध्ये भागधारक बनवण्याचं आमिष दाखवलं. यानंतर त्यांनी अशा प्रकारची गुंतवणूक जवळपास वर्षभर सुरु ठेवली. जेव्हा त्यांना त्यांचा नफा काढून घ्यायचा होता, तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी लष्करी अधिकाऱ्याने आपले पैसे परत मागितले, तसेच पेमेंटची पावती मागितली तेव्हा अण्णा शेरमन नावाने दावा करणाऱ्याने त्याना मेसेज केला की त्यांचे पैसे टेस्लामध्ये गुंतवले आहेत आणि आता त्यांनी टेस्ला वाहन घेण्यासाठी अजून गुंतवणूक करावी. मात्र, तोपर्यंत या माजी अधिकाऱ्याने ७२ लाख ट्रान्सफर केले होते. यानंतर आपळी फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.