भारतातील तुरुंगात जाण्यास संयुक्त अरब अमिरातीतील सुमारे ८० टक्के भारतीय कैदी पात्र आहेत; परंतु त्यांपैकी केवळ १० टक्के कैद्यांनीच मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आह़े  भारतीय तुरुंगांच्या तुलनेत तेथील तुरुंगांत चांगल्या सुविधा मिळत असल्याची कारणे देत उर्वरित कैद्यांनी भारतात परतण्यास नकार दिला आह़े
भारत आणि अरब राष्ट्रांमध्ये नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या कैदी हस्तांतरण करारानुसार ८० टक्के भारतीय कैदी भारताच्या ताब्यात जाण्यास पात्र आहेत, अशी माहिती अरब अमिरातीतील भारतीय राजदूत टी़  पी़  सीताराम यांनी दिली़  केवळ १२० कैद्यांनी भारतात परतण्यासाठी अर्ज केल्याचे आणि हे प्रमाण एकूण पात्र कैद्यांच्या केवळ १० टक्के असल्याचे बुधवारी अबुधाबी येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट दिल्यानंतर सीताराम यांनी सांगितल़े
अरब राष्ट्रांतील तुरुंगांत मिळणाऱ्या सुविधांमुळे आणि काही कैद्यांनी त्यांना झालेल्या शिक्षेची माहिती भारतातील परिचितांना कळवली नसल्यामुळे बहुतांश कैद्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला आह़े येथील काही कैद्यांकडे आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधायला पैसे नाहीत, तर काही जणांना क्षमायाचना करण्यासाठी कायदेशीर साहाय्याची आवश्यकता आह़े  मात्र येथील भारतीय कैदी सुस्थितीत आहेत़
कैद्यांच्या स्थलांतराचे निकष काय?
अरब अमिरातीतील भारतीय कै द्याला भारतातील तुरुंगात स्थलांतरित व्हायचे असेल, तर त्या कैद्याची किमान सहा महिन्यांची तरी शिक्षा शिल्लक असावी, तसेच त्याच्यावर किंवा तिच्यावर कोणतेही खटले सुरू नसावेत़  तसेच त्या कै द्याची स्वत:हून स्थलांतर होण्याची इच्छा असेल, तरच त्याचे स्थलांतर करण्यात येत़े