‘आम्हाला काही इजा झाली, तर ऑपरेशन गंगा अयशस्वी ठरेल’, अ्से युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

 भारत सरकारने आपल्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यसाठी वाट पाहण्याची आपली तयारी नसल्याने आम्ही जिवाचा धोका पत्करून पायीच रशियाच्या सीमेकडे वाटचाल करू, असेही या विद्यार्थ्यांच्या एका मोठय़ा गटाने शनिवारी एका व्हिडीओत सांगितले.

 ‘आम्ही सुमी स्टेट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत. आज युद्धाचा दहावा दिवस आहे. माणुसकीच्या आधारे दोन शहरांसाठी युद्धबंदी करून मार्ग मोकळा करण्याची रशियाने घोषणा केली असल्याचे आम्हाला आज कळले. सकाळपासून आम्ही बॉम्बवर्षांव आणि तोफगोळय़ांचा मारा यांचे आवाज ऐकत आहोत. आम्ही घाबरलो आहोत. आम्ही जिवाचा धोका पत्करून सीमेच्या दिशेने निघालो आहोत. आम्हाला काही झाले, तर ती आमच्या सरकारची आणि भारतीय दूतावासाची जबाबदारी असेल. आमच्यापैकी एकालाही इजा झाली, तर मिशन गंगा हे मोठे अपयश ठरेल’, असे इतर विद्यार्थ्यांसोबत उभी असलेली एक विद्यार्थिनी व्हिडीओत म्हणत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सुमीतील आपल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहांत अडकलेल्या सुमारे ८०० वैद्यकीय विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी बॉम्बवर्षांवामुळे जाग आली. पाणीपुरवठय़ाअभावी दैनंदिन गरजांच्या वस्तूंसाठी त्यांना बाहेर पडावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांचे नातेवाईक काळजीत आहेत.