योगाला जे विरोध करत आहेत ते या देशाचे हितचिंतक नाहीत, अशा शब्दांत भाजपने टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही योगाला मान्यता दिली असताना विरोध कशासाठी, असा सवाल मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी उपस्थित केला आहे.
ज्याला योग करायचे नाही त्यांनी खुशाल घरी जाऊन झोप काढावी. मात्र योगाला विरोध हा समाजद्रोह आणि राष्ट्रविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगाने योग स्वीकारलेले असताना अनावश्यक वाद कशाला निर्माण केला जात आहे. हा काही भाजपचा राजकीय कार्यक्रम नाही, तर तो संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले. शाळेत योग अनिवार्य करण्यावरून मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळासह काही अल्पसंख्य गटांनी विरोध दर्शवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2015 रोजी प्रकाशित
‘योगाला विरोध करणारे देशद्रोही’
योगाला जे विरोध करत आहेत ते या देशाचे हितचिंतक नाहीत, अशा शब्दांत भाजपने टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही योगाला मान्यता दिली असताना विरोध कशासाठी, असा सवाल मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी उपस्थित केला आहे.

First published on: 12-06-2015 at 02:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to yoga anti national act nandkumar singh