वॉशिंग्टन : अमेरिकेत ११ सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतची काही कागदपत्रे खुली करण्याचे आदेश अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत. त्या हल्ल्यात मरण पावलेल्या काही लोकांच्या नातेवाइकांनी या हल्ल्याबाबतच्या काही नोंदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. या हल्ल्यात सौदी अरेबियाचा सहभाग असल्याचे एका अहवालात म्हटले होते.

११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या स्मृतींना वीस वर्षे पूर्ण होण्या आधीच ही कागदपत्रे खुली करण्याचा आदेश देण्यात आला असून सरकार व मृतांचे कुटुंबीय यांच्यात कागदपत्रे खुली करण्याबाबत वाद सुरू होता. त्यामुळे बायडेन यांनी वर्गीकृत कागदपत्रातील कुठली माहिती खुली करता येईल याचा विचार केला आहे.