युद्धानंतर पाकिस्तान अथवा चीनला स्थलांतरित झालेल्या लोकांनी मागे ठेवलेल्या मालमत्तांबाबतचे दावे किंवा हस्तांतरण याविरुद्ध त्यांचे संरक्षण करणाऱ्या सुमारे ५० वर्षे जुन्या शत्रूची मालमत्ता कायद्यामध्ये (एनिमी प्रॉपर्टी लॉ) सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने चौथ्यांदा अध्यादेश जारी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शत्रूची मालमत्ता’ याची व्याख्या, शत्रूच्या, त्याच्या प्रजेच्या किंवा शत्रूदेशातील फर्मच्या मालकीची, शत्रूच्या वतीने धारण केलेली अथवा ताब्यात ठेवलेली मालमत्ता अशी करण्यात आली आहे. सरकारने या मालमत्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत स्थापन करण्यात आलेल्या ‘कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ या कार्यालयाकडे सोपवल्या आहेत. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर १९६८ साली तयार करण्यात आलेला शत्रू मालमत्ता कायदा अशा मालमत्तांचे नियमन करतो, तसेच संरक्षकाचे अधिकार नमूद करतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ordinance for enemy property law reform in india
First published on: 30-08-2016 at 02:04 IST