वन रँक वन पेंशन या योजनेसाठी गेले तीन महिने सुरु असलेले माजी सैनिकांचे उपोषण आज पंतप्रधानांनी केलेल्या खुलाश्यानंतर मागे घेण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे उपोषण सुरु होते.
स्वेच्छानिवृत्तीबाबतच्या खुलाश्यानंतर आम्ही आमच्या लोकांना उपोषण मागे घेण्यास सांगत आहोत. पण, आमच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी म्हटले. स्वेच्छानिवृत्ती घेणा-या सैनिकांनाही या योजनेचा लाभ मिळेल असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. मोदींच्या खुलाश्यानंतर उपोषण करत असलेल्या माजी सैनिकांमध्ये आनंद पसरला आणि त्यांनी पेढे वाटले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2015 रोजी प्रकाशित
तीन महिन्यांनंतर माजी सैनिकांचे उपोषण मागे
वन रँक वन पेंशन या योजनेसाठी गेले तीन महिने सुरु असलेले माजी सैनिकांचे उपोषण आज पंतप्रधानांनी केलेल्या खुलाश्यानंतर मागे घेण्यात आले आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 06-09-2015 at 16:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orop veterans welcome govt decision withdraw hunger strike protests to continue