scorecardresearch

माशेलकर पद्मविभूषण, दाभोलकरांना पद्मश्री

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या धोरणांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ख्यातनाम योगगुरू

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या धोरणांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ख्यातनाम योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांची यावर्षीच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणारे पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या १२७ जणांच्या नावांची घोषणा  राष्ट्रपती भवनातून शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समित्यांचे सदस्य राहिलेले डॉ. माशेलकर हे केंद्र सरकारच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालकही होते. याआधी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. माशेलकर यांच्यासह महाराष्ट्रातील २१ जणांचा पद्मविजेत्यांच्या यादीत समावेश आहे. गेल्या वर्षी पुण्यात निर्घृण हल्ल्यात मारले गेलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरोधात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला. याशिवाय दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बलात्कार कायद्यात कडक तरतुदी सुचवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख माजी न्यायमूर्ती जगदीश शरण वर्मा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रांतून ‘पद्म’साठी निवड झालेल्यांमध्ये गायिका बेगम परवीन सुलताना, प्रा. ज्येष्ठराज जोशी, टेनिसपटू लिएंडर पेस, नयना आपटे-जोशी, तबलावादक विजय घाटे, अभिनेता परेश रावल, अभिनेत्री विद्या बालन यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू युवराज सिंग, अभिनेता कमल हासन, रस्कीन बाँड, पी. गोपीचंद यांनाही पद्मने गौरवण्यात आले आहे.
आईची आठवण झाली
सकाळी सात वाजता मला केंद्रीय गृह मंत्रालयातून फोन आला आणि पद्मविभुषण जाहीर झाल्याचे कळले आणि मला पटकन माझ्या आईची आठवण आली. आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या आईमुळेच. देशाने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी सीएसआयआरमधून निवृत्त होत होतो त्यावेळेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते की, डॉ. माशेलकर यांचे जीवन आणि कार्य हे दोन्ही तरूणांना प्रोत्साहन देणारे आहे. पण अजून तुमचे सर्वोत्तम येणे अपेक्षित आहे. त्यांच्या या वाक्याची मला आठवण झाली आणि मला माझे सर्वोत्तम असे द्यायचे आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर

सात अनिवासी भारतीय
अमेरिकास्थित मागो अँड असोसिएट्स कंपनीचे सर्वेसर्वा अशोककुमार मागो, अमेरिकेतील कर्करोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मुखर्जी, जैववैद्यक संशोधक डॉ. वासमी मूथा, आणि जपानमधील शिक्षणतज्ज्ञ डॉ. सेंगाकू मेयडा यांचा पद्म पुरस्कार विजेत्यांत समावेश आहे.
दिवंगत न्या. जगदीश शरण वर्मा (सार्वजनिक सेवा),
बेगम परवीन सुलताना (शास्त्रीय गायन), प्रो. ज्येष्ठराज जोशी (विज्ञान-तंत्रज्ञान), कमल हासन (चित्रपट), अनिता देसाई (साहित्य),  प्रो. गुलाम मो. शेख (चित्रकला), टी. एच. विनयाक्रम (घटमवादन), न्या. दलवीर भंडारी (सार्वजनिक क्षेत्र), प्रो. पद्मनाभन बलराम (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. मदप्पा महादेवप्पा (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. थिरूमलाचारी रामसामी (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. विनोद प्रकाश शर्मा (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. राधाकृष्णन कोप्पल्लिल (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. मृत्युंजय अत्रेय (साहित्य-शिक्षण), डॉ. धीरुभाई ठाकेर (साहित्य), वीरमुथू रामसामी थेवर (साहित्य), विजयेंद्र नाथ कौल (नागरी सेवा), दिवंगत डॉ. अनुमोलू रामकृष्ण (विज्ञान-तंत्रज्ञान),  प्रो. अनसिुझ्झमन, बांगलादेश (साहित्य-शिक्षण), प्रो. लॉईड रुडॉल्फ, अमेरिका (साहित्य-शिक्षण), प्रो. सुझान एच. रुडॉल्फ, अमेरिका (साहित्य-शिक्षण), डॉ. नीलम क्लेर (वैद्यक – नॅनोटेक्नॉलॉजी)
दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर (सामाजिक कार्य), प्रताप गोविंदराव पवार (व्यापार-उद्योग), डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे (वैद्यक),  प्रो. डॉ. शशांक जोशी (वैद्यक), केकी एन. दारुवाला (साहित्य),मोहम्मद अली बेग (नाटय़कला), मुसाफिर राम भारद्वाज (वाद्यसंगीत), सावित्री चटर्जी (चित्रपट), प्रो. बिमन बिहारी दास (शिल्पकला), सुनील दास (चित्रकला), एलम इंदिरा देवी (मणिपुरी नृत्य), राणी कर्ना (कथक), बन्सी कौल (रंगभूमी), उस्ताद मोईनुद्दीन खान (सारंगीवादन), गीता महालिक (ओडिसी नृत्य), परेश मैती (चित्रकला), राम मोहन (अ‍ॅनिमेशनपट), वेंडेल ऑगस्टिन रॉड्रिक्स (फॅशन डिझाइन), प्रो. कलामंडलम सत्यभामा (मोहिनीअट्टम), अनुज (रामानुज), शर्मा (दृश्यकला), संतोष सिवन (चित्रपट), सुप्रिया देवी (बंगाली चित्रपट), सोनी तारापोरवाला (पटकथा लेखन), दुर्गा जैन (सामाजिक कार्य), डॉ. राम राव अनुमोलू (सामाजिक कार्य), डॉ. ब्रह्म भट (सामाजिक कार्य), मुकुल चंद्र गोस्वामी (सामाजिक कार्य), जे. एल. कौल (सामाजिक कार्य), मथुराभाई माढाभाई सावनी (सामाजिक कार्य), ताशी तोंडुप (सार्वजनिक सेवा), डॉ. हसमुख चमनलाल शाह (सार्वजनिक सेवा), शेखर बसू (विज्ञान-तंत्रज्ञान), माधवन चंद्रादाथन (विज्ञान-तंत्रज्ञान), प्रो. सुशांत कुमार दासगुप्ता (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. रविभूषण ग्रोवर (विज्ञान-तंत्रज्ञान), प्रो. एलुवथिंगल देवासी जेम्मीस (विज्ञान-तंत्रज्ञान), रामकृष्ण व्ही. होसूर (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. अजयकुमार परिदा (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. एम. वाय. एस. प्रसाद (विज्ञान-तंत्रज्ञान), किरणकुमार अलूर सेलीन (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. ब्रह्म सिंह (विज्ञान-तंत्रज्ञान), प्रो. विनोदकुमार सिंह (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. गोविंदन सुंदरराजन (विज्ञान-तंत्रज्ञान), रामस्वामी आर. अय्यर (विज्ञान-तंत्रज्ञान), डॉ. जयन्तकुमार घोष (विज्ञान-तंत्रज्ञान), रवीकुमार नारा (व्यापार-उद्योग), राजेश सरिया (व्यापार-उद्योग), मल्लिका श्रीनिवासन (व्यापार-उद्योग), डॉ. कीर्तिकुमार मनसुखलाल आचार्य (वैद्यक), डॉ. बलराम भार्गव (वैद्यक), प्रो. डॉ. इंद्र चक्रवर्ती (वैद्यक), प्रो. डॉ. पवनराज गोयल (वैद्यक), प्रो. आमोद गुप्ता (वैद्यक), प्रो. डॉ. दयाकिशोर हझरा (वैद्यक), प्रो. डॉ. टी. पी. जॅकब (वैद्यक), प्रो. हकीम सैद खलीफतुल्लाह (वैद्यक), डॉ. ललीत कुमार (वैद्यक), डॉ. मोहन मिश्र (वैद्यक), डॉ. एम. सुभद्रा नायर (वैद्यक), डॉ. अशोक पानगरिया (वैद्यक), डॉ. नरेंद्रकुमार पांडेय (वैद्यक), डॉ. अशोक राजगोपाल (वैद्यक), डॉ. कामिनी ए. राव (वैद्यक), डॉ. सर्वेश्वर सहारैया (वैद्यक), प्रो. डॉ. ओमप्रकाश उपाध्याय (वैद्यक), प्रो. डॉ. महेश वर्मा (वैद्यक), डॉ. जे. एस. तिथियाल (वैद्यक), डॉ. नीतिश नाईक (वैद्यक), डॉ. सुब्रत कुमार आचार्य (वैद्यक), डॉ. राजेश कुमार ग्रोव्हर (वैद्यक), डॉ. नाहीद अबिदी (साहित्य-शिक्षण), छाकछुआक छुआनवावरा (साहित्य), प्रो. कोकाकलुरी एनोच (साहित्य), प्रो. डॉ. वेदकुमारी घई (साहित्य), मनोरमा जाफा (साहित्य), प्रो. रेहाना खातून (साहित्य), डॉ. वायखोम गोजेन मैतेयी (साहित्य), विष्णू नारायण नम्बुथिरी (साहित्य), प्रो. दिनेश सिंह (साहित्य), डॉ. पी. किलेमसुंगला (साहित्य), अंजुम चोप्रा (क्रिकेट), सुनील दबास (कबड्डी), लव्हराजसिंह धर्मशक्तू (गिर्यारोहण), , एच बोनीफेस प्रभू (व्हीलचेअर टेनिस), युवराजसिंग (क्रिकेट), ममता सोधा (गिर्यारोहण), परवीन तल्हा (नागरी सेवा), अशोककुमार मागो, अमेरिका (व्यापार-उद्योग), डॉ. सिद्धार्थ मुखर्जी, अमेरिका (वैद्यक), डॉ. वामसी मुथा, अमेरिका (वैद्यक संशोधन), डॉ. सेंगाकू मायेदा, जपान (साहित्य-शिक्षण)

प्रतिक्रिया
“सरकारने माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाची दखल घेतली याचा मला खूप आनंद झाला आहे. या पुरस्कारामुळे मला आता अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’
डॉ. शशांक जोशी

“पुरस्कार मिळाल्यामुळे मला झालेला आनंद अवर्णनीय आहे. माझ्या देशाने मला दिलेला हा पुरस्कार आहे. मला ‘विद्या बालन’ म्हणून ओळख देणाऱ्या कुटुंबियांना हा पुरस्कार समर्पित करते.”
विद्या बालन

“भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. अनेकांना या उच्च पुरस्काराची प्रतीक्षा असते. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. माझं भाग्य म्हणून मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो.”
कमल हासन

“मला साहित्य आणि शिक्षण यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. या पुरस्कारामुळे कामाला अधिक बळ मिळाले आहे. भविष्यात आणखी काम करण्याची इच्छा आहे.”
गणेश देवी

“आपल्याला जाहीर झालेला पद्मविभूषण किताब हा वैयक्तिक स्वरूपाचा नाही. हा तर योगविद्येचाच सन्मान झाला अशीच माझी भावना आहे. व्गेली ८० वर्षे हे काम अव्याहतपणे सुरू आहे.यामध्ये पुणेकरांचाही मोलाचा वाटा आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्याबरोबर हा किताब जाहीर झाला याचा आनंद आहे.”
बी. के. एस. अय्यंगार

“गेली पन्नास वर्षे प्रामाणिकपणे कलेच्या श्रेत्रात काम केलं. जिथे जिथे म्हणून माझा सहभाग होता तिथे तिथे अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मी जे काम केलं त्याचं आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सदिच्छांचं फळ म्हणजे हा पुरस्कार आहे. माझ्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली याबद्दल आनंद झाला आहे.”
ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

“आनंद हा झालाच शिवाय जबाबदारीही वाढली. देशातील अनेक प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सुटणार आहेत. त्यामुळे अधिक चांगले काम करून दाखवायचे आहे.”
डॉ. जे. बी. जोशी

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2014 at 12:40 IST

संबंधित बातम्या