नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी हल्लेखोरांच्या डोक्यातच गोळी घाला अशी मागणी केली होती. त्यानुसारच तिनही दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवअंतर्गत संपण्यात आले असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत नमूद केले.

ऑपरेशन सिंदूरबाबत राज्यसभेत बुधवारी शहा यांनी चर्चेला उत्तर दिले. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून, ते लष्कर-ए-तैय्यबाशी संबंधित असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. त्यापूर्वी शहा यांनी राज्यसभेत बोलायला सुरुवात करताच, विरोधकांनी पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे अशी मागणी केली. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावल्यावर त्यांनी सभात्याग केला.