Pahalgam Terror Attack पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेव मध्ये झाल्याची माहिती समोर येते आहे. पहलगाम या ठिकाणी एप्रिल महिन्यात निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं. आता या हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं होतं २२ एप्रिलला?

पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा निषेध जगभरातून करण्यात आला. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन पर्वतातील कुरणावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. यामध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. आता या हल्लामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेवमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले होते. पहलगाममधील हल्ला हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ‘या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना आम्ही मुळीच सोडणार नाही. दहशतवादी कल्पनाही करु शकणार नाहीत अशी शिक्षा त्यांना दिली जाईल अशीही घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती. ज्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं.