पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मेजर आणि ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या (SPG) तीन कमांडोंचा समावेश आहे. बलुचिस्तानातील हरनाई भागात एका उड्डाण मोहिमेदरम्यान हा अपघात झाला आहे. पाकिस्तान लष्कराने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नाही.
कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल
पाकिस्तानातील आंतर सेवा जनसंपर्क कार्यालयाने या अपघाताची पुष्टी केल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने प्रकाशित केले आहे. या दूर्घटनेत सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.