पाकिस्तानात आज लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. २६६ जागांसाठी हे मतदान होत असून त्यासाठी ५ हजार १२१ उमेदवार रिंगणार आहेत. पाकिस्तानात निवडणूक होत असतील तरीही सगळ्यांना हे ठाऊक आहे की लष्कर ज्या नेत्याच्या बाजूने आहे तोच नेता जिंकणार. पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान नवाज शरीफ असणार, बिलावल भुत्तो असणार की इम्रान खान या चर्चा रंगत आहेत. अशात एक अहवाल समोर आला आहे. या निवडणुकीत लष्कराने लक्ष घातल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं आहे.

या अहवालाने माजवली खळबळ

समोर आलेलल्या अहवालानुसार नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पाकिस्तानात उदयास येईल असा अंदाज आहे. तसंच बिलावल भुत्तो यांचा पाकिस्तान पिपुल्स पार्टी हा पक्ष दुसऱ्या क्रमाकांवर असेल असंही बोललं जातं आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इम्रान खान यांचा पाकिस्ता तहरीक ए इन्साफ हा पक्ष असेल आणि मग इतर पक्ष असतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक

कसा तयार झाला अहवाल?

पाकिस्तानमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पोलीस सूत्र, महसूल विभाग, श्रमिक संघटना आणि इतर विविध क्षेत्रातल्या मान्यवर लोकांशी बोलून तयार करण्यात आला आहे. या अहवालात हा दावा करण्यात आला आहे की नवाज शरीफ यांच्या PMLN पक्षाला ११५ ते १३२ जागा लोकसभा निवडणुकीत मिळतील. यामध्ये महिला आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी ज्या आरक्षित जागा आहेत त्या जोडल्या गेल्या तर नवाज शरीफ यांचा PMLN हा पक्ष स्वबळावर पाकिस्तानात सत्ता स्थापन करु शकतो असाही अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार भुत्तो यांच्या पक्षाला ३५ ते ४० जागा मिळतील असा अंदाज आहे तर पीटीआय म्हणजेच इम्रान खान यांच्या पक्षाला २३ ते २९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या अहवालात असंही एके ठिकाणी असंही नमूद करण्यात आलं आहे की सगळी मतं जोडून शरीफ यांच्या पक्षाला १९० च्या आसपास जागा मिळतील. अहवालाप्रमाणेच जर निकाल आले तर नवाज शरीफ यांना कुणाच्याही मदतीची गरज राहणार नाही.

हे पण वाचा- इम्रान खान यांच्या ‘इनिंग’ची अखेर? पाकिस्तानमध्ये कोण होणार सत्ताधीश आणि किती काळ?

मोबाईल सेवा बंद

पाकिस्तानमध्ये आज नव्या सरकारसाठी मतदान सुरु आहे. इम्रान खान हे तुरुंगात असल्याने नवाज शरीफ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. पाकिस्तानात आज मोबाइल सर्विसवर बंदी घालण्यात आली आहे. रॉयटर्सच्या बातमीनुसार पाकिस्तानात आज मोबाईल सेवेवर प्रतिबंध लादण्यात आले आहेत. आज पाकिस्तानात जे मतदान पार पडतं आहे त्यानंतर जर नवाज शरीफ पंतप्रधान झाले तर पाकिस्तानचे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होईल. पाकिस्तानात कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.