Pakistan flash floods : पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला असून अनेक शहरे आणि गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. येथे आलेल्या भीषण पुरामुळे अवघ्या २४ तासाच्या आथ ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पीडितांच्या बचावासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरमधील पाच क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे.
वायेव्य पाकिस्तानात आळेल्या या पुराचा मोठ्या भागाला फटका बसला आहे. येथे नद्या नाल्या भरून वाहत आहेत, याबरोबरच रस्ते आणि घरांमध्ये देखील पाणी भरले आहे. जागोजागी झाडे उन्माळून पडली आहेत. पाण्यात रस्ते वाहून गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.
सोशल मीडियावर पुराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये घरे, रस्ते पाण्याने भरल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहने पाण्यावर तरंगत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत बचाव पथकांना मदत पोहचवण्यात अडथळा येत आहे.
पीर बाबा आणि मलिकपुरा या भागात सर्वाधिक नुकसान झाले असून येथे शुक्रवारी सर्वात जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. बचाव पथके या भागातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने बुनेरचे उपायुक्त काशिफ कय्युम यांच्या हवाल्याने दिले आहे.
بونیر اور سوات کی موجودہ صورتحال ⛈️⛈️?
— Weather Updates PK (@WeatherWupk) August 15, 2025
Weather Updates PK 2.0 – Jawad Memon / #pakistandoppler pic.twitter.com/9uNNF9wnSc
जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचंड नुकसान केले आहे. विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि उत्तरेकडील प्रदेशांमध्ये दाट लोकसंख्या असलेल्या भागात पावसाचा मोठा फटका बसला आहे. येचे भीषण पूर, भुस्खलनाच्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रोव्हेंशियल आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटी (PDMA)ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, अचानक आलेल्या पुरात ३०७ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये बुनेरमध्ये किमान १८४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
तर शुक्रवारी PDMA प्रवक्त्याने मृत किंवा जखमी असलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली होती. कारण प्रभावित भागांमध्ये अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
अफगाणिस्तान सीमेजवळील बाजौर येथे पूरग्रस्त भागात मदत सामग्री पोहोचवण्यासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना देखील घडली. येथे खराब हवामान असल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत पाचही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे.