विवाहाचा प्रस्ताव धुडकावणाऱ्या युवतीला जिवंत जाळले

विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून १८ वर्षांच्या युवतीला जाळून मारल्याची भीषण घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नौशाहरो फिरोज प्रांतात घडली.

विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून १८ वर्षांच्या युवतीला जाळून मारल्याची भीषण घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नौशाहरो फिरोज प्रांतात घडली.
सदर तरुणाचे नाव साजिद कुरेशी असे असून तो कापडाचा व्यापारी आहे. त्याने दिलेला विवाहाचा प्रस्ताव पीडित युवतीची आई आणि भावाने अनेकदा फेटाळल्याने संतप्त झालेल्या कुरेशीने त्या युवतीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जिवंत जाळले. कुरेशीला पोलिसांनी अटक केली आहे.
मद्यपान केलेल्या अवस्थेत कुरेशीने सोमवारी त्या युवतीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला  करण्याचाही प्रयत्न केला. त्याला युवतीने प्रतिकार केला आणि तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर कुरेशीने तिच्या अंगावर केरोसीन ओतले आणि तिला पेटवून तो तेथून पसार झाला.
सदर युवतीला तातडीने तालुका हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले तेव्हा तिचे ६० ते ६५ टक्के शरीर जळले होते, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिला कराचीतील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan girl burned alive for rejecting marriage proposal

ताज्या बातम्या