Pakistan Spying On Millions Of Citizens : चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने पाकिस्तान जनतेची नाराजी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्याया उद्देशाना लाखो नागरिकांवर पाळत ठेवत असल्याची माहिती ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या (Amnesty International) रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलही एक आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संस्था असून जगभरात मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करते.
या रिपोर्टनुसार पाकिस्तान सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लावण्यासाठी चिनी बनावटीची इंटरनेट फायरवॉल वापरत आहे. याबरोबरच ते लॉफुल इंटरसेप्ट मॅनेजमेंट सिस्टीम (LIMS)च्या मदतीने एकाच वेळी ४० लाख मोबाईल फोनवर हेरगिरी करू शकतात.
या फायरवॉलचे नाव डब्लूएमएस २.० ( WMS 2.0) असे असून ही इंटरनेट ट्रॅफिकवर लक्ष ठेवते आणि एका वेळी २० लाख अॅक्टिव्ह सेशन्सना ब्लॉक करू शकते. मानवाधिकार संघटनेने माहिती दिली की, त्यांनी लायसनिंग करार, ट्रे़ड डेटा, लीक झालेल्या टेक्निकल फाईल्स आणि चिनी रेकॉर्ड्स तपासले ज्यामधून या फायरवॉल पुरवठादाराचे बीजिंगमधील सरकारच्या मालकीच्या कंपन्यांशी असलेले संबंध समोर आले.
ॲम्नेस्टीने सांगितले की, ही फायरवॉल अमेरिकेतील नियागरा नेटवर्क्स या कंपनीची उपकरणे, फ्रान्सच्या थेल्स (Thales) युनिटमधील थेल्स डीआयएस (Thales DIS) चे सॉफ्टवेअर, आणि चीनच्या एका सरकारी आयटी फर्मचे सर्व्हर वापरते.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “हे दोन मॉनिटरिंग सिस्टीम एकत्र काम करतात : एकामुळे गुप्तचर यंत्रणांना कॉल आणि मेसेज टॅप करता येतात, तर दुसरी देशभरातील वेबसाईट आणि सोशल मीडियाचा वेग कमी करते किंवा ते पूर्णपणे ब्लॉक करते.”
“मोठ्या प्रमाणावर हेरगिरी केल्याने समाजात एक दहशतीचा इफेक्ट तयार होतो, ज्यामुळे लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन त्यांचे हक्कांचा वापर करणे टाळतात,” असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की पाकिस्तान सध्या जवळपास ६५०,००० वेब लिंक्स ब्लॉक करत आहे आणि यूट्यूब, फेसबूक आणि एक्स अशा प्लॅटफॉर्म्स वापरण्यावर बंधने आण आहे.
या रिपोर्टमध्ये एजन्सीज या एलआयएमएसच्या माध्यमातून किमान ४० लाख मोबाईल फोन्सवर एकाच वेळी पाळत ठेवत असल्याचा आरोप केला. तर डब्लूएमएस २.० हे एकाच वेळी २० लाख अॅक्टिव्ह सेशन्स ब्लॉक करते, असे अम्नेस्टीने म्हटले आहे.