आपल्याच देशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार रोखू न शकरणारा पाकिस्तान आता भारताला धडे देत आहे. पाकिस्तानने एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून हरिद्वार येथील परिषदेत अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने कथित द्वेषयुक्त भाषणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने याला भारतातील मुस्लिमांच्या भवितव्याचे भीषण चित्र म्हटले आहे. हरिद्वारमधील वेद निकेतन धाम येथे १७ ते १९ डिसेंबर दरम्यान झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध कथित द्वेषयुक्त भाषणांचे प्रकरण पाकिस्तानात पोहोचले आहे. पाकिस्तानने सोमवारी इस्लामाबादमधील भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रभारी उच्चायुक्तांना बोलावून मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त केली.

हरिद्वारमधील वेद निकेतन धाम येथील धर्मसंसदेतील वक्त्यांनी मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे दिली होती. गाझियाबादमधील डासना मंदिराचे पुजारी यती नरसिंहानंद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुस्लिमांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आधीपासून नरसिंहानंद यांच्यावर नजर ठेवून आहेत.

धर्म संसदेत वादग्रस्त विधाने सुरूच; गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींसाठी वापरले अपशब्द, मुख्यमंत्र्यांनी सोडला कार्यक्रम

कार्यक्रमात, अनेक वक्त्यांनी चिथावणीखोर आणि द्वेषपूर्ण भाषणे केली, ज्यात अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या हत्येबद्दल बोलले गेले. याबाबत पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्याला नागरी समाज आणि देशाच्या लोकांच्या एका भागाद्वारे कथित द्वेषयुक्त भाषणांकडे आपण गंभीर चिंतेने पाहिले आहे असे सांगितले.

धर्म संसदेच्या नावाखाली नरसंहाराची हाक; सर्वोच्च न्यायालयाच्या ७६ वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

एका अधिकृत निवेदनात, पाकिस्तान मंत्रालयाने म्हटले आहे की, “आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रभारी एम सुरेश कुमार यांना इस्लामाबादमधील उच्चायुक्तामध्ये बोलावले आणि हिंदुत्व समर्थक भारतीय मुस्लिमांच्या नरसंहाराबद्दल बोलत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.” पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, भारतासाठी ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे की आयोजकांनी कोणतीही खंत व्यक्त केली नाही किंवा भारत सरकारने त्यांचा निषेध केला नाही. त्यांच्यावरही कारवाई झालेली नाही. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे इस्लामबद्दलच्या भीतीची बिघडणारी प्रवृत्ती उघडकीस आणली आहे आणि भारतातील मुस्लिमांच्या भवितव्याचे भीषण चित्र रेखाटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की भारताने या द्वेषयुक्त भाषणांची आणि अल्पसंख्याकांविरुद्धच्या व्यापक हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. काँग्रेस आणि तृणमूलसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की ते हरिद्वारमधील भाषणांचा निषेध व्यक्त केला आगे. यात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.