भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेले संशयाचे वातावरण निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये औपचारीक चर्चा सुरू व्हावी, यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे परराष्ट्रमंत्रालयातील प्रवक्ते अजिझ चौधरी यांनी पत्रकरांना सांगितले.
भारताबरोबर संवाद सुरू करण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माजी कुटनीतिज्ञ शहरीयार खान यांची नियुक्ती केली आहे. खान यांनी नुकताच भारत दौरा केला. दोन्ही देशातील परस्पर संबंध सुधारावेत, अशी पाकिस्तानमधील नेते मंडळींची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढील चर्चेसाठी दोन्ही देशातील आधिकारी तारखांची जुळवाजुळव करीत आहेत.