Pakistani man lands in Jeddah Saudi Arabia instead of Karachi: पाकिस्तानमधून एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून अनेकांना हसू रोखता येणार नाही. येथे प्रवासी हे लाहोरहून कराची येथे जाण्यासाठी एका विमानात चढला पण ही फ्लाईट कराचीला जाण्याऐवजी सौदीच्या जेद्दाह विमानतळावर पोहचली. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची जगभरात फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रवाशांना सौदीहून परत लाहौर येथे पाठवण्यात आलं. पण प्रवाशांची अडचणी येथेच संपल्या नाहीत, यानंतर देखील त्या पाकिस्तानी एअरलाईनने प्रवाशाला फसवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ जुलै रोजी घडली. एक इलेक्ट्रिक इंजिनिअर मलिक शाहजैन याच्या बरोबर एअरलाईन कंपनी एअरसियालच्या फ्लाइटमध्ये घडली. हा व्यक्ती त्याच्या देशांतर्गत फ्लाइटमध्ये बसण्याऐवजी आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये चढला आणि विशेष बाब म्हणजे त्याची कोणीही तपासणीही केली नाही. पण जेव्हा विमान दोन तास झाले तरी कराची येथे पोहचेना तेव्हा त्याने एअर हॉस्टेसला कराची अजून आले कसे नाही म्हणून विचारले. पण त्याच्या या प्रश्नावर त्याच्या बरोबरच्या प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

नागरिक उड्डान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ते या असामान्य घटनेची चौकशी करत आहेत. “एखादा प्रवासी चुकून वेगळ्याच विमानात चढू शकतो परंतु देशांतर्गत प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानात चढल्याचे प्रकरण आमच्या पाहण्यात आलेले नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शहजैन यांच्या मते, ७ जुलै रोजी रात्री जेव्हा त्यांना कळाले की त्यांचे मूल आजारी पडले आहे, त्यानंतर ते लाहौरहून कराचीला परत येत होते. ते विमानतळावर पोहचले आणि त्यांनी आधीच बुक केलेला बोर्डिंग पास दाखवला , ज्यानंतर त्यांना लाउंज आणि डिपार्चर गेटकडे घेऊन जाण्यात आले.

शाहजैन यांनी सांगितले की एअरसियालचे दोन विमान टर्मिनलवर होते, एक कराची आणि दुसरे जेद्दाह जाणारे होते. कर्मचाऱ्याने व्यवस्थित तपासणी न करताच मला आंतरराष्ट्रीय विमानात बसवून दिले आणि मला याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा उड्डाणा करून दोन तास झाले तरी आम्ही उतरलो नाही. प्रवासी जेद्दा येथे उतरला पण त्याचे सामान मात्र कराचीला पोहचले.

जेद्दा विमानतळावर अधिकाऱ्यांनी शाहजैन याची कित्येक तास चौकशी केली, पण अखेर त्यांच्या लक्षात आले की त्याची कोणतीही चूक नसताना त्याला येथे सोडण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी एअरलाईनला त्याला पुढील कराची येथे जाणाऱ्या विमानात बसवून देण्याचे निर्देश दिले.

पण प्रवाशांच्या अडचणी येथेच संपल्या नाहीत, कारण एअरलाइन्सने विमान कंपनीने या प्रवाशाला पुन्हा लाहोर येथे परत पाठवलं आणि त्याला सांगितलं की त्याला कराचीसाठीचे तिकीट स्वतः काढावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहजैन याने सांगितलं की मला माझ्या मुलाच्या आजारपणाबद्दल सांगण्यात आले आणि मी घरी परतण्याचा निर्णय घेतला. कारण मी ऑफिसच्या कामासाठी लाहोर येथे गेलो होतो. मात्र मला १५ तास संघर्ष करावा लागला. मी जेद्दाह येथे पोहचलो आणि तेथे मला कितीतरी तास चौकशीचा सामना करावा लागला.